Tuesday, April 21, 2020

ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते?

ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते? 


सखोल अभ्यास अचूक नियम, शंका तुमची निराकरण आम्ही करणार!
प्रश्न तुमचा उत्तर आम्ही देणार
भ्रष्टाचारमुक्त ग्रामपंचायत
संकल्पना आपली
पेटून उठा



महाराष्ट्रात मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 व त्या अंतर्गत केलेले नियम यानुसार ग्रामपंचायतीची काम करणे बंधनकारक आहे.


ग्रामपंचायतीने करावयाची कामे पुढील प्रमाणे?

  1. ग्रामपंचायतींनी त्यांच्या कार्यक्षेत्रात जनतेसाठी पाणीपुरवठा व स्वच्छता रस्ते ,सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, गावातील पथदिवे इत्यादी सुविधा पुरविणे व सामाजिक आर्थिक सांस्कृतिक मागासवर्गीयांचे कल्याण, महिला व बाल कल्याणाचे विविध उपक्रम हाती घेणे बंधनकारक आहे.
  2. ग्रामपंचायत हद्दीतील जन्म मृत्यु उपजत मृत्यू, विवाह इत्यादींच्या नोंद घेणे, शासनाने विहीत केलेल्या वेळापत्रकानुसार व गावातील ग्रामस्थांच्या निकडी नुसार ग्रामसभा घेणे क्रमप्राप्त आहे.
  3. ग्रामस्थांनी मागणी केल्यानुसार ग्रामसभेची व ग्रामपंचायतीच्या ठरावांच्या इतिवृत्ताची  प्रत सात दिवसात देणे बंधनकारक आहे.
  4. केंद्र शासन, राज्यशासन ,जिल्हा परिषद व पंचायत  समित्यांनी ग्रामपंचायत कडे सोपविलेल्या योजनांची अंमलबजावणी करणे ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे.
  5. इत्यादी. … … ..

सरपंचाची कर्तव्य काय आहेत?


  1. अधिनियमानुसार सरपंच यांना कार्यकारी शक्ती प्रदान केली असून ताे ग्रामपंचायतीचे प्रशासकीय प्रमुख म्हणून कामकाज पाहतो.
  2. सरपंच पंचायतीच्या सभेचे विनियमन करेल व पंचायतीच्या सर्व अधिकाऱ्यांनी /कर्मचाऱ्यांनी केलेल्या कृती व कार्यवाहीवर व देखरेख व नियंत्रण ठेवेल.
  3. अधिनियमानुसार आवश्यक असलेली सर्व विवरणे व अहवाल तयार ठेवण्याची व्यवस्था करेल.
  4. अधिनियमानुसार तसेच शासनाच्या निर्देशाखाली देणे आवश्यक असतील अशी प्राप्ती प्रमाणपत्र आपल्या सहीने व पंचायतीच्या मुद्रेनिशी देतील.
  5. गाव पातळीवर विविध विकास कार्यक्रम अभियान व योजनेत लोकांचा सहभाग घेऊन गाव समृद्ध करण्याचा प्रयत्न करेल.

ग्रामसेवकांची कामे कोणती?

  1. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कामकाज पाहतो.
  2. ग्रामसभा व मासिक सभेसमोर जमा व खर्च मंजुरीसाठी ठेवणे.
  3. विविध स्वरूपाचे ग्रामस्थांना दाखले देणे.
  4. ग्रामपंचायत हद्दीतील वेगवेगळे कर वसूल करणे त्याची नोंद घेऊन कराची रक्कम बँकेत जमा करणे आगामी वर्षासाठी कराची मागणी तयार करून मागणी देयके पाठवणे.
  5. ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक विहित मुदतीत अधिनियमानुसार तयार करून पंचायत समितीकडे सादर करावे.
  6. पिकावरील विविध रोगाबाबत ग्रामस्थांना जाहीर दवंडीद्वारे माहिती देणे.
  7. साथीचे रोग प्रतिबंधक उपाययोजना करणे , पुरेसा टीसीएल साठा ठेवणे व त्याचा पाणी शुद्धीकरणासाठी नियमित वापर करणे.
  8. गावातील साथीच्या आजारात बाबत प्राथमिक माहिती आरोग्य अधिकारी व गटविकास अधिकारी यांना देणे.
  9. गावातील पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती व संनियंत्रण करणे.
  10. जन्म मृत्यू उपजात मृत्यू व विवाह यांची नोंदणी करणे.

ग्रामपंचायतीचे कामकाज चालवण्यासाठी कायदेशीर तरतुदी यांची  माहिती  मिळवण्यासाठी  व कायदे विषयक तरतुदी जाणून घेण्यासाठी या पेज ला follow करा... 

No comments:

Post a Comment

ग्रामस्थांची सनद

ग्रामस्थांची सनद  जबाबदार ,गतिमान, प्रतिसादशील व लोकाभिमुख पंचायतराज व्यवस्थेसाठी "ग्रामस्थांची सनद" शासनाच्या धोरणानुसार ...