ग्रामस्थांची सनद
जबाबदार ,गतिमान, प्रतिसादशील व लोकाभिमुख पंचायतराज व्यवस्थेसाठी "ग्रामस्थांची सनद"
शासनाच्या धोरणानुसार राज्यातील सर्व ग्रामस्थांना पारदर्शक गतिमान लोकाभिमुख व प्रतिसादशील प्रशासनाद्वारे जबाबदाराने सेवा पुरवणे ही पंचायत राज संस्थेची जबाबदारी आहे, जनतेला स्वतःच्या हक्काची माहिती होणे व कर्तव्याची जाणीव करून देणे.
पंचायत राज संस्थेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवेचा दर्जा राखण्यासाठी पंचायतराज संस्थेमार्फत काम करणाऱ्या सर्व अधिकारी /कर्मचाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणे, त्यानुसार अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, सेवा पुरवण्याचे स्तर निश्चित करून ग्रामस्थांना सेवा पुरवण्यामध्ये विलंब झाला अथवा अधिकारी / कर्मचार्यांकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर याबाबत ग्रामस्थांनी कोणाकडे दाद मागावी याबाबत निश्चित स्थर ठरविण्यात आलेले आहेत.
पंचायतराज संस्थामार्फत अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या योजना, त्या-त्या योजनांबाबत गाव, तालुका व जिल्हास्तरावर जबाबदार असलेले अधिकारी/कर्मचारी, ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या संविधानिक जबाबदाऱ्या, याबाबतची माहिती ग्रामस्थांना व्हावी यासाठी ग्रामपंचायतीच्या सनदेमध्ये खालील परिशिष्ट यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद यांनी त्यांची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे.
ग्रामस्थांची सनद
उद्दिष्टा बाबतची अनुक्रमणिका
अ.क्र.
|
परिशिष्ट
|
उद्दिष्टे
|
१
|
परिशिष्ट १
|
ग्रामविकास विभागाची संरचना व उद्दिष्टे
|
२
|
परिशिष्ट २
|
पंचायत राज संस्थांची योजना विषयक जबाबदारी
|
३
|
परिशिष्ट ३
|
पंचायतराज संस्थांची सांविधानिक जबाबदारी
|
४
|
परिशिष्ट ४
|
ग्रामीण विकास योजना प्रगती दर्शक फलक
|
परिशिष्ट ३;
पंचायतराज संस्थांची सांविधानिक जबाबदारी
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व त्या अंतर्गत केलेले नियम यानुसार ग्रामपंचायतीने कामे करणे बंधनकारक आहे. यामध्ये ग्रामपंचायतीची कामे, सरपंचांची कामे, ग्रामसेवकांची कामे काय आहेत हे जाणून घेण्यासाठी येथे @क्लिक करा@
ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीशी संबंधित काही कामांची माहिती व त्यांच्या कार्यपूर्ती चा कालावधी यांची माहिती खाली नमूद केलेली आहे.
अ. क्र.
|
कार्यसूची
|
जबाबदार कर्मचारी /अधिकारी
|
कार्यपूर्तीचा कालावधी
|
विहित मुदतीत काम न झाल्यास खालील ठिकाणी तक्रार करावी.
|
१.
|
जन्म नोंदणीचा दाखला देणे. (पाच वर्षाच्या आतील नोंद)
|
ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी
|
२ दिवस
|
गटविकास अधिकारी पंचायत समिती
|
२.
|
मृत्यू नोंदीचा दाखला देणे. (पाच वर्षाच्या आतील नोंद)
|
ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी
|
२ दिवस
|
गटविकास अधिकारी पंचायत समिती
|
३.
|
विवाह नोंदणीचा दाखला देणे.
|
ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी
|
२ दिवस
|
गटविकास अधिकारी पंचायत समिती
|
४.
|
फेरफार अर्जावर कार्यवाही करणे.
|
ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी
|
३० दिवस
|
गटविकास अधिकारी पंचायत समिती
|
५.
|
ग्रामपंचायत येणे बाकी दाखला देणे.
|
ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी
|
२ दिवस
|
गटविकास अधिकारी पंचायत समिती
|
६.
|
खाजगी नळजोडणी परवाना देणे /नाकारणे
|
ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी
|
३० दिवस
|
गटविकास अधिकारी पंचायत समिती
|
७.
|
व्यवसाय /उद्योग परवाना देणे
|
ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी
|
३० दिवस
|
गटविकास अधिकारी पंचायत समिती
|
८.
|
हयातीचा दाखला देणे.
|
ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी
|
२ दिवस
|
गटविकास अधिकारी पंचायत समिती
|
९.
|
बेघर दाखला देणे.
|
ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी
|
२ दिवस
|
गटविकास अधिकारी पंचायत समिती
|
१०.
|
रहिवासी दाखला देणे.
|
ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी
|
२ दिवस
|
गटविकास अधिकारी पंचायत समिती
|
११.
|
बेरोजगार दाखला देणे.
|
ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी
|
२ दिवस
|
गटविकास अधिकारी पंचायत समिती
|
१२.
|
विद्युत जोडणी ना हरकत प्रमाणपत्र.
|
ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी
|
३० दिवस
|
गटविकास अधिकारी पंचायत समिती
|
१३.
|
दारिद्र रेषेखालील असले बाबत दाखला.
|
ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी
|
२ दिवस
|
गटविकास अधिकारी पंचायत समिती
|
१४.
|
वृद्धांसाठी निराधार असले बाबत दाखला
|
ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी
|
२ दिवस
|
गटविकास अधिकारी पंचायत समिती
|
१५.
|
बांधकाम परवाना देणे ग्रामपंचायत हद्दीत.
|
ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी
|
६० दिवस
|
गटविकास अधिकारी पंचायत समिती
|
१६.
|
नमुना ८ अ चा उतारा देणे
|
ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी
|
२ दिवस
|
गटविकास अधिकारी पंचायत समिती
|
१७.
|
जनतेकडून आलेल्या तक्रारींना अंतिरिम उत्तर
|
ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी
|
२१ दिवस
|
तत्सम वरिष्ठ अधिकारी व जिल्हा परिषदांचे खातेप्रमुख
|
१८.
|
जनावरांच्या आरोग्याची दाखवा देणे
|
पशुधन विकास अधिकारी
|
२ दिवस
|
गटविकास अधिकारी पंचायत समिती/ पशुधन विकास अधिकारी ( विस्तार)
|
१९.
|
जनावराचे शविवच्छेदन
अहवाल व मृत्यू दाखला देणे.
|
पशुधन विकास अधिकारी
|
२१ दिवस
|
गटविकास अधिकारी पंचायत समिती
|

ग्रामपंचायत संबंधित प्रश्नांसाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा... .
ReplyDelete