Monday, April 20, 2020

भ्रष्टाचार मुक्त ग्रामपंचायत.

भ्रष्टाचार मुक्त ग्रामपंचायत


   



भ्रष्टाचार मुक्त गाव ही संकल्पना आपले समोर मांडताना मला अत्यंत आनंद होत आहे.


१) भ्रष्टाचार म्हणजे नेमकं काय?

भ्रष्टाचार म्हणजे खराब किंवा बिघडलेले आणि आचार म्हणजे आचरण किंवा वागणूक! अनैतिक व अनुसुचित असे कोणत्याही प्रकारचे आचरण(कृती)म्हणजेच भ्रष्टाचार होय.

२) बहुतांशी ग्रामपंचायतींची भूमिका सद्यस्थितीला काय आहे. … याचे अवलोकन प्रत्येकाने आपल्या गावामध्ये करावे. … प्रामुख्याने एक गोष्ट जाणवते ती म्हणजे भ्रष्टाचार त्याचे नेमके कारण काय? आपण ते रोखू शकतो का?

३) मित्रांनो आज भ्रष्टाचार नावाच्या राक्षसाने फार मोठे रौद्ररूप धारण केलेले आपणास दिसते. सरकारी यंत्रणेवर असणारा सर्वसामान्य माणसांचा विश्वास दिवसेंदिवस ढासळत चाललेला आहे. या सर्वांना कारणीभूत म्हणजे काही सरकारी भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी  जे स्वतःच्या स्वार्थासाठी व मूठभर स्वार्थी लोकांच्या हितासाठी आपले कर्तव्य विसरतात आणि स्वतःला भ्रष्टाचारी राक्षसांच्या स्वाधीन करून देतात..

४) भ्रष्टाचार निर्मूलनाची सुरुवात ही प्रत्येक गावातूनच झाली तरच भ्रष्टाचाराची पाळेमुळे उखडून पडतील.  त्यासाठी प्रत्येक गाव पातळीवर समजदार व प्रशिक्षित युवकांची युवाशक्ती एकत्र आली व शासनाचे आवश्यक तेवढे सर्व महत्त्वाचे नियम व कायदे तसेच हक्क अधिकार व कर्तव्य सुद्धा सामान्य माणसांना समजून सांगितले  तर गावातला तालुक्यातला जिल्ह्यातला पुढे राज्यातला देशातला असा गल्ली ते दिल्ली असा संग्रम भ्रष्टाचाराचा राक्षस मरून पडायला वेळ लागणार नाही.


जबाबदार नागरिकांची लक्षणे काय आहेत?

  1. प्रामाणिकपणा
  2. कायद्यातील बारकावे यांचा अभ्यास
  3. सरकारी कामकाज कसे चालते याचे ज्ञान
  4. शिस्त वक्तशीरपणा
  5. शासकीय अधिकारी व कर्मचारी विषयी आदरभाव
  6. मृद भाषी
  7. सार्वजनिक हिताची कळकळ
  8. सतत पाठपुरावा
  9. सतत अभ्यास

भ्रष्टाचाराची माहिती मिळाल्यावर काय करायला हवाय?

  1. भ्रष्टाचाराची माहिती मिळाली की ताबडतोब सार्वजनिक करायला पाहिजे.
  2. संबंधितांवर कठोर कारवाई होण्यासाठी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केले पाहिजेत.
  3. माहितीचा अभ्यास करून त्यातून बातमी तयार करून मीडियाला द्यावी.
  4. मीडिया छापत नसेल तर फेसबुक व्हाट्सअप युट्युब सोशल मीडियावर अपलोड करा.
  5. माहिती संकलन करून पत्रक व फ्लेक्स तयार करून नियमानुसार सार्वजनिक ठिकाणी लावा..

मित्रांनो या नियमांचा अभ्यास तरी का करावा ,कारण ही लढाई आहे भ्रष्ट राक्षसा विरोधात आणि लढाई म्हटल्यावर यामध्ये पलटवार हे होतातच  संबंधित राक्षस माझे भ्रष्ट अधिकारी /कर्मचारी अर्जदाराला पराभूत करण्यासाठी त्याला अडचणीत आणण्यासाठी/ जाणून-बुजून मानसिक त्रास देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात त्यामुळे सावधगिरीने अभ्यासपूर्वक अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी या या इंटरनेट पेज ची निर्मिती केली आहे. …

हे सगळं ठीक आहे पण तुमच्या मनात अनेक प्रश्न पडले असतील कि,

  • भ्रष्टाचार शोधावं तरी कस?
  • त्यासाठी काय काय करायला हवं?
  • नेमकं कोणत्या प्रमुख कायद्यांचा अभ्यास करायला हवय? किंवा कोणत्या मार्गाने पाठपुरावा करावा?
  • या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आमच्या या पेजवर मिळतील…


     चला तर मग जाणून घेऊया आपले अधिकार मानवाधिकार

            

No comments:

Post a Comment

ग्रामस्थांची सनद

ग्रामस्थांची सनद  जबाबदार ,गतिमान, प्रतिसादशील व लोकाभिमुख पंचायतराज व्यवस्थेसाठी "ग्रामस्थांची सनद" शासनाच्या धोरणानुसार ...